Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नव्या वर्षासाठी बॉयफ्रेंडसोबत केली पार्टी सकाळी मिळाला तरुणीचा मृतदेह !
    क्राईम

    नव्या वर्षासाठी बॉयफ्रेंडसोबत केली पार्टी सकाळी मिळाला तरुणीचा मृतदेह !

    editor deskBy editor deskJanuary 4, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरात नव्या वर्षाचे जंगी स्वागत करण्यात आले असून अनेक ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना झारखंडच्या दुमकामधून समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच तेथे एका तरूणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. आदल्या रात्रीच तिने बॉयफ्रेंडसोबत न्यू ईअरची पार्टी केली. पण सकाळी मात्र बेडखाली तिची डेडबॉडी सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणात त्या तरूणीच्या बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप लावण्यात आला असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, दुमका येथील काठीकुंडच्या चंद्रपुरा येथे ३३ वर्षांची ही तरूणी बांधपाडा भागात एका घरात भाड्याने रहात होती. णी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ती बॉयफ्रेंड चीकूसोबत पार्टी करत होती. पण सकाळी एकच कल्लोळ माजला. कारण त्या तरूणीचा मृतदेह बेडच्याखाली सापडला. त्या तरूणीच्या मैत्रिणीने तिला बेडखाली पडलेलं पाहिल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडला जाब विचारला. तेव्हा तो म्हणाला की रात्री (मद्यपान) जास्त झाल्याने तिची तब्येत खराब झाली आहे. त्यामुळेच ती अशी (जमीनीवर) पडली आहे. त्यानंतर तो तिथून निघून गेला.

    त्यानंतर त्या मैत्रिणीने तिला हलवलं, उठवायचा प्रयत्नही केला पण त्या तरूणीने काहीच हालचाल केली नाही. तिचा मृत्यू झाला होता. हे पाहून तिची मैत्रीण हादरलीच. तिने लगेचच तिच्या कुटुंबियांना फोन केला तसेच पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. या घटनेसंदर्भात समजताच पोलिस तातडीने तघटनास्थळी दाखल झाले आणि फॉरेन्सिक टीसह त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी त्या रूममधून मद्याचा ग्लास जप्त केला, तसेच अनेक फिंगरप्रिंट्सही घेतले.

    या घटनेपूर्वी त्या तरूणीने इतर दोन तरुणांसोबत पार्टी केली होती. यानंतर तेथे मो. अख्तर ऊर्फ चिकू तिथे आला. इतर तरुणांसोबत पार्टी करण्यावरून त्या दोघांमध्ये भांडण झाले. मात्र त्यानंतर मो. अख्तर उर्फ चिकूने तिच्यासोबत पार्टी केली. सकाळी साडेआठला जेव्हा त्याने रूमचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला ती तरूणी मृतावस्थेत सापडली. दुमका एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विद्यार्थिनीच्या प्रियकरासह चार तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदन अहवालानंतरच उलगडेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महसूल विभागात खळबळ : पाच हजाराची लाच घेताना तलाठी अटकेत

    March 26, 2026

    राज्यात मार्चच्या शेवटी उष्णतेतून अवकाळी पावसाकडे – हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’ !

    March 26, 2026

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.