Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बायकोचा मोबाईल नवऱ्याने मागितला अन बायकोने डोळाच फोडला !
    क्राईम

    बायकोचा मोबाईल नवऱ्याने मागितला अन बायकोने डोळाच फोडला !

    editor deskBy editor deskJanuary 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    अनेक पती व पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कारणाने भांडण सुरु असते. पण काही कालातंराने हे भांडण शांत देखी होत असते पण एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. एका शुल्लक कारणावरुन बायकोने कात्रीने हल्ला करत नवऱ्याचा डोळ्याला इजा पोहोचवली आहे. नवरा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये बागपत जिल्ह्यात नवऱ्याने बायकोकडे गाणी ऐकण्यासाठी मोबाईल मागितला होता. यावरुन झालेल्या वादानंतर ही घटना घडली आहे. प्रियंका असे पत्नीचे नाव आहे. तर अंकित असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे. अंकितने प्रियंकाकडे गाणी ऐकण्यासाठी तिचा मोबाईल मागितला होता. परंतु, तिने फोन देण्यास नकार दिला. तरीही अंकितने मोबाईलसाठी देण्यास आग्रह केला. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. वादादरम्यान प्रियंकाला राग अनावर झाला. संतापलेल्या प्रियंकाने अंकितच्या डोळ्यावर कात्रीने वार केला. यात अंकित गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पत्नी प्रियंकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. अंकितच्या कुटुंबियांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महसूल विभागात खळबळ : पाच हजाराची लाच घेताना तलाठी अटकेत

    March 26, 2026

    राज्यात मार्चच्या शेवटी उष्णतेतून अवकाळी पावसाकडे – हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’ !

    March 26, 2026

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.