Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिलांना प्रेग्नंट करा, अन मिळवा १३ लाख !
    क्राईम

    महिलांना प्रेग्नंट करा, अन मिळवा १३ लाख !

    editor deskBy editor deskJanuary 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील काही राज्यात सायबरवरून होणारी लुट गेल्या काही वर्षापासून झपाट्याने वाढत चाललेली असतांना आता नवीन एक मोठा घोटाळा समोर आला आहे. हि घटना बिहार राज्यातून समोर आली आहे. महिलांना प्रेग्नंट करण्याच्या नावावर अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पगार बिहार सायबर पोलिसांनी पदार्फाश केलाय. महिलांना प्रेग्नंट करा, १३ लाख रुपये मिळवा. महिला प्रेग्नंट नाही झाल्या तरी ५ लाख कुठेच गेले नाहीत, अशा प्रकारची ऑफर तरुणांना देऊन त्यांना लुटले जात होतं. याप्रकरणी बिहार पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८ जणांना अटक करण्यात आलीय.

    नोकरी नाही का, पैशाची तंगी आहे, लखपती बनायचंय तर ही स्कीम तुमच्यासाठी आहे, असे मेसेज अनेक तरुणांना सोशल मीडियावर येत असतं. लखपती होण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायचे नाहीय. फक्त एका महिलेला प्रेग्नंट करायचंय. तिला जेव्हा मुल होईल, तेव्हा तुम्हाला बक्षीस म्हणून १३ लाख रुपये दिले जातील. जरी ती महिला प्रेग्नंट नाही झाली तरी तुम्हाला ५ लाख रुपये मिळतील, असे आमिष या मेसेजमध्ये दाखविण्यात येत होते.

    या आमिषात तरुण मुलं फसत होती. सोशल मीडियावर पाठवण्यात आलेल्या महिलांना त्यांच्या पतीपासून मुले होऊ शकत नसलेल्याचं फसलेल्या तरुणांना वाटायचं. ज्यांना या मेसेजवर रिप्लाय दिला की त्या तरुणांकडे ७९९ रुपये रजिस्ट्रेशन फी मागितली जायची. यानंतर तरुणांना महिलांचे फोटो पाठविले जात. यापैकी एक महिला सिलेक्ट करण्यास सांगितले जायचं. तरुणांना महिलेला सिलेक्ट केले की त्यांच्याकडे ५ ते २० हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून मागितले जात. हवस आणि पैशाचे आमिष दिसल्याने भुललेले तरुण पैसे भरत. यानंतर हे ठग गायब व्हायचे. हे सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने कोणाशीच संपर्क होत नव्हता.

    मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या एसआयटीला गुप्तचरांकडून या स्कॅमची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी जिल्ह्यातील गुरम्हा गावातील मुन्ना कुमार उर्फ दीपक यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. या छापेमारीत ८ जणांना अटक करण्यात आलीय. तर याप्रकरणातील मुख्य आरोपीसह दोन जण फरार आहेत.

    कारवाईनंतर पोलीस उपअधीक्षक कल्याण आनंद यांनी सांगितलं की, ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब या संस्थेच्या माध्यमातून हे गुन्हेगार फसवणूक करत होते. महिलांना गरोदर राहण्याच्या नावाखाली सर्व आरोपी लोकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होते. तरुणांकडून पैसे उकाळण्यासाठी आरोपी मोबाईलवर फोटोही पाठवत असे. जर महिला गरोदर राहिली तर १३ लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात येतील. जर गरोदर नाही राहिली तरीही ५ लाख रुपये देण्यातील असं सांगून तरुणांकडून पैसे उकाळले जात. आरोपींच्या फोनवरून मिळालेल्या डेटाच्या आधारे पोलिसांनी अनेकांशी बोलणे केले आहे. आरोपी परराज्यातील लोकांनाही आपला शिकार बनवत असत. तपासात समोर आले आहे. पोलिसांनी फोनवरून अनेक महिला आणि पुरुषांचे फोटोही जप्त केले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.