Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कौटुंबिक वाद : सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळल्याचा प्रकार !
    क्राईम

    कौटुंबिक वाद : सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळल्याचा प्रकार !

    editor deskBy editor deskDecember 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    अनेक परिवारात छोट्या मोठ्या कारणावरून वाद होत असतात, पण ते वाद काही वेळाने मिटत असतात, पण एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. कौटुंबिक वादातून विवाहितेला सासरच्या लोकांनी जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिला जवळपास ९० टक्के भाजली आहे. सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भांडूपच्या सोनापूरमधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादातून महिलेला आज (२७ डिसेंबर) सासरच्या मंडळींनी जिवंत जाळलं आहे. दीर, नणंद दोघांनी केरोसीन ओतून महिलेला जिवंत जाळल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांना दीर आणि नणंद दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. महिलेला आधी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलला हलवण्यात आलं आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वाद नेमका काय झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026

    भररस्त्यात पोलिसाला थप्पड; मद्यधुंद दांपत्याचा सिग्नलवर राडा !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.