Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सरप्राईज गिप्ट देण्याच्या बहाणा : मैत्रिणीचे डोळे बांधत जिवंत जाळले !
    क्राईम

    सरप्राईज गिप्ट देण्याच्या बहाणा : मैत्रिणीचे डोळे बांधत जिवंत जाळले !

    editor deskBy editor deskDecember 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरातील अनेक मोठ्या शहरात प्रेमाच्या नावावर अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतीच एक धक्कादायक घटना चेन्नई शहरातून समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या सॉप्टवेअर इंजिनिअर मैत्रिणीची हत्या केली. वाढदिवशी सरप्राईज गिप्ट देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीचे डोळे बांधले त्यानंतर साखळीने बांधत तिला जिवंत जाळल्याची घटना चेन्नईत घडलीय. संशंयित आरोपीची ओळख पटवण्यात आली असून त्याचं नाव वेट्रिमारन आहे. आरोपी एक ट्रान्स पुरुष आहे. त्यानेच त्याची सॉफ्टवेअर मैत्रिणीला जिवंत जाळल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.

    मिळालेल्या माहितीनुसार, सॉप्टवेअर इंजिनिअर असलेली २५ वर्षीय नंदिनी मदुराई येथील रहिवाशी असून हे दोघेही एकमेंकांना ओळखत होते. विशेष म्हणजे काही काळ ते एकत्रही राहिले होते. मदुराई येथील शाळेत आरोपी २६वर्षीय ट्रान्ससेक्शुअल पंडी माहेश्वरी आणि मृत नंदिनी शिकत होते. त्यानंतर हे दोघे एकाच कंपनीत काम करत होते. त्यावेळी हे दोघेही एकत्र राहत होते.

    काही दिवसानंतर माहेश्वरीने लिंग बदललं आणि तिने स्वत:चं नाव वेट्रिमारन ठेवलं. त्यानंतरही नंदिनीने माणुसकीच्या नात्याने तिच्याशी मैत्री ठेवली. परंतु या वेट्रिमारनचं नंदिनीवर प्रेम जडलं होतं. वेट्रिमारनला नंदिनीशी लग्न करायचे होते, त्यासाठी तिने लिंग बदललं. पण ज्या मुलीसोबत लग्न करायचं होतं, त्याच मैत्रिणींची वेट्रिमारनने हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपीचं नाव पंडी महेश्वरी (आधीची महिला ) लिंग बदल्यानंतर तिने तिचं नाव वेट्रिमारन ठेवलं होतं. शनिवारी चेन्नईच्या दक्षिणेकडील उपनगर केलंबक्कमजवळील थलंबूर येथे वेट्रिमारनने नंदिनीला तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सरप्राईज गिप्ट देण्याच्या बहाणा केला. सरप्राईजसाठी त्याने नंदिनीच्या डोळ्यावर पट्टी बांधली, त्यानंतर तिला साखळीत बांधून आणि जिवंत जाळलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात मार्चच्या शेवटी उष्णतेतून अवकाळी पावसाकडे – हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’ !

    March 26, 2026

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.