Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskDecember 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील हरिविठ्ठल नगरातील एक ३८ वर्षीय मजूर आठवडाभर काम केल्यानंतर मजूरीचे पैसे घेण्यासाठी जातांना रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेची धडक लागून रवींद्र अशोक मिस्तरी (शिरसाठ) (वय ३८) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात रविंद्र मिस्तरी हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते इमारतींना रंग देण्याचे काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. आठवडाभर काम केल्यानंतर त्याचा मोबदला घेण्यासाठी ते हरिविठ्ठल नगरातून खंडेराव नगरकडे जात होते. त्या वेळी विश्वकर्मा मंदिरानजीक रेल्वे रुळ ओलांडतांना रविंद्र मिस्तरी यांना धावत्या रेल्वेची धडक बसली. त्यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. त्यानंतर लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती लागलीच रामानंद नगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यानंतर संजय आफ्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.