Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतात तोडली पाने अन बाप लेकाच्या मारहाणीत चिमुकलीचा मृत्यू !
    क्राईम

    शेतात तोडली पाने अन बाप लेकाच्या मारहाणीत चिमुकलीचा मृत्यू !

    editor deskBy editor deskDecember 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरातील अनेक राज्यात खुनाच्या घटना सातत्याने घडत असताना एक धक्कादायक घटना बिहार राज्यातून समोर आली आहे. शेतातील हरभऱ्याच्या भाजीची पाने तोडल्याच्या रागातून १४ वर्षीय मुलीला काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या बेदम मारहाणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, चैनपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या हाता गावातील जितेंद्र राम यांची मुलगी सुंदरी कुमारी (१४) तिच्या चुलत भावासोबत बुधवारी (२० डिसेंबर) शेजारच्या गावातील एका शेतात भाजी काढण्यासाठी गेली होती. यावेळी तिला शेतमालक रामधर यादव आणि त्यांचा मुलगा गौरव यादव या दोघांनी हरभऱ्याच्या भाजीची पाने खुडताना पाहिले.

    यावेळी बाप लेकांनी मिळून मुलीला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुंदरी कुमारीचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुलीचे वडिल जितेंद्र राम यांनी चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

    याप्रकरणी बोलताना चैनपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ शंभू कुमार यांनी “आम्ही आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या घटनेनंतर कैमूरचे जिल्हा सचिव विजय यादव यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय-एमएलच्या पाच सदस्यीय पथकाने पिडीतेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबियांनी आरोपींना तात्काळ अटक करावी आणि 20 लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात मार्चच्या शेवटी उष्णतेतून अवकाळी पावसाकडे – हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’ !

    March 26, 2026

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.