Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमआयडीसी पोलिसांची कारवाई : रजा संपल्यानंतर पळून जाताना गुन्हेगार अटकेत !
    क्राईम

    एमआयडीसी पोलिसांची कारवाई : रजा संपल्यानंतर पळून जाताना गुन्हेगार अटकेत !

    editor deskBy editor deskDecember 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    नाशिक कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बंदी गुड्डू उर्फ कानशा वहाब शेख (वय २६, रा. तांबापूरा) हा संचित रजेवर आला होता. रजा संपल्यानंतर तो सुरत येथे पळून जात असतांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता तांबापूरा परिसरातून अटक केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात गुड्डु उर्फ कानशा वहाब शेख याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नाशिक कारागृहात तो शिक्षा भोगत होता. २१ नोव्हेंबर रोजी त्याला २१ दिवसांची संचित रजा मंजूर झाल्यानंतर तो बाहेर आला होता. १३ डिसेंबर रोजी त्याची रजा संपल्यानंतर देखील तो कारागृहात हजर झाला नाही. त्यामुळे कारागृह शिपाई महेंद्र मंगल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आरोपीचा शोधार्थ पथक तयार करुन रवाना केले. ४८ तासाच्या आत मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आरोपी गुड्डु उर्फ कानशा वहाब शेख हा सुरत येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांनाच तांबापूरा परिरातून अटक केली आहे. दुपारी ३ वाजता आरोपीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.