Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उभ्या बल्करला कार धडकली : तीघ गंभीर जखमी !
    क्राईम

    उभ्या बल्करला कार धडकली : तीघ गंभीर जखमी !

    editor deskBy editor deskDecember 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    महामार्गावर उभ्या असलेल्या ओव्हरलोड बल्करला (पावडर वाहून नेणारे ट्रक) कारने मागून धडक दिली. समोरून येत असलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट बल्करवर जाऊन आदळली. त्यात कारमधील तीनजण गंभीर जखमी झाले, तर कुत्राही चिरडला गेला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथून जळगावच्या दिशेने कार (क्र. एमएच ०४ सीटी ८६१०) जात होती. यावेळी महामार्गावर अचानक कारसमोर कुत्रा पळत आला. त्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार महामार्गावर उभ्या करून ठेवलेल्या राखेच्या बल्करवर जाऊन आदळली. या अपघातात आवेश शेख (२४, रा. १५ बंगला भुसावळ), रोशन महेकर (२२) आणि मयांक महेकर (२४) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.