Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नाहून घरी येताना भीषण अपघातात परिवारातील चौघांनी गमविला जीव !
    क्राईम

    लग्नाहून घरी येताना भीषण अपघातात परिवारातील चौघांनी गमविला जीव !

    editor deskBy editor deskDecember 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची घटना घडत असतांना नुकतेच कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली. त्यात एका कुटुंबातील चौघांना आपला जीव गमावावा लागला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा देखील समावेश होता. या चिमुकल्यांचे आयुष्य सुरू होण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

    मिळालेल्या माहितीनुसार, नगर – कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीत येथे काल रविवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात माळशेज घाटाशेजारी असणारे मढ या गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा अपघातात मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून मेव्हणीच्या लग्नावरून रात्री उशिरा घरी परतत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५), हर्षद मस्करे (वय ४), काव्या मास्करे (वय ६) अशी मृतांची नावे आहेत.

    गणेश मस्करे हे आपल्या कुटुंबासोबत आपल्या मेव्हणीच्या लग्नासाठी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या गावी गेले होते. लग्न आटोपून ते रात्री उशिरा आपल्या घरी परतत होते. ते भाजीपाला व्यावसायिक असल्याने त्यांनी पीकअप गाडी भरली होती. आपल्या कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे टोकावडे याठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी जाणार होते. मात्र, नियतीच्या मनात काही तरी औरच होते. ते आपल्या घरी पोहचण्याअगोदरच पिंपळगाव जोगा या ठिकाणी त्यांच्या गाडीचा भीषण आपघात झाला. या अपघातात बायको आणि त्यांच्या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मस्करे कुटुंब हे गावातील अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे कुटुंब होते. ते गावातील स्थानिक रहिवासी असल्याने सर्वांशी त्यांचा चांगला सलोखा होता. मात्र. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जुन्या घरगुती वादातून तरुणावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार !

    April 23, 2026

    चुंचाळेत बेकायदेशीर बियाणे विक्री उघड; एक आरोपी गजाआड

    April 23, 2026

    रुद्राक्षाचा चमत्कार दाखवत वृद्धाला लुबाडले;भोंदूंची जळगाव बसस्थानकात करामत

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.