Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजन
    जळगाव

    जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 14, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;– दरवर्षी जागतिक कौशल्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याकरिता जिल्हास्तर, विभागीयस्तर आणि राज्यस्तरावर परिक्षा होवून निवड झालेल्या उमेदवारांची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड केली जाते.

    यावर्षी दिनांक 17 व 18 ऑगस्ट, 2021 रोजी जिल्हास्तरावर, दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी विभागीय स्तरावर आणि दिनांक 3 ते 5 सप्टेंबर, 2021 दरम्यान राज्यस्तरावर स्पर्धा घेण्याचे निश्चित झालेले आहे.
    जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता 15 ऑगस्ट, 2021 पर्यंत “महास्वयंम” पोर्टलवरील लिंकव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या स्पर्धा घोषीत कार्यक्रमानुसार होतील.
    तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी “महास्वयंम” पोर्टलवरील लिंकव्दारे स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. राजपाल कोल्हे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

    “महास्वयंम” पोर्टलवरील गुगल लिंक:

    https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9-eIBlPWfEYny_XK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.