Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील खून प्रकरणी आणखी एक संशयित अटकेत
    क्राईम

    जळगावातील खून प्रकरणी आणखी एक संशयित अटकेत

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव शहरातील समता नगरातील २८ वर्षीय अरुण बळीराम सोनवणे या तरुणाचा वंजारी टेकडीवर निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी सुरूवातीला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलदीप उर्फ सोनू आढळे याला विसरवाडी जवळून अटक केली होती तर दुसर्‍या संशयिताला नेपानगरात जळगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील संशयित आरोपी अशोक महादु राठोड (वय ३२ ) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी भागात खून करून पसार झालेला संशयित अशोक महादू राठोड हा नेपानगरात असल्याची एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. विशेष पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, किशोर पाटील, नाना तायडे, किरण पाटील, रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक हेमंत कळसकर, विजय जाधव आदींनी ही कारवाई केली. संशयिताला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

    तरुणाच्या खून प्रकरणी गोकुळ बळीराम सोनवणे (31, समतानगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित सोनू आढाळे, पप्पू आढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड आणि योद्धा उर्फ पिंट्या शिरसाठ अशा पाच जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात खून व प्राणघातक हल्ला या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन संशयितांना अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा कसून शोध सुरू आहे. तपास सहा.पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.

    #jalgaon Action Crime कारवाई गुन्हे जळगाव
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    मोहोडी-गुरु पेट्रोल पंप मार्गाच्या दुरुस्तीसाठी वैशाली अमित पाटील यांचे निवेदन; आयुक्तांची तत्काळ दखल, अधिकाऱ्यांना सूचना

    June 21, 2026

    पहाटेचा भीषण स्फोट : गॅस सिलिंडर फुटून महिलेचा होरपळून मृत्यू; ९ जणांना नागरिकांनी वाचवले !

    June 20, 2026

    कीर्तन सुरू असतानाच काळाचा घाला; यशवाडी देवस्थानात भीषण दुर्घटना

    June 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.