Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ३० वर्षीय महिलेवर धावत्या रेल्वेत अत्याचार करून फेकले !
    क्राईम

    ३० वर्षीय महिलेवर धावत्या रेल्वेत अत्याचार करून फेकले !

    editor deskBy editor deskDecember 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील अनेक राज्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना यात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुली व महिलांना टार्गेट करीत त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडत आहे. अशीच एक घटना उत्तरप्रदेशच्या जबलपूर शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास धावत्या ट्रेनमध्ये एका ३० वर्षीय महिलेवर नराधमाने तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला डब्यातून बाहेर फेकलं. त्यानंतर स्वत:ला ट्रेनच्या रिकाम्या एसी डब्यात कोंडून घेतलं. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना सोडून रविवारी रात्री ही ट्रेन रिकामी परतत होती. यावेळी पीडित महिला कटनी रेल्वे स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढली. तिला उचाहराला येथे जायचं होतं. दरम्यान, आरोपी ट्रेनमध्ये आधीपासूनच हजर होता. त्याने महिलेला टॉयलेटमध्ये जाताना बघितले.

    कमलेश कुशवाह (वय २२ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तैनात पोलीस दलासाठी स्पेशल ट्रेन चालवण्यात आली होती. टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर आरोपीने पीडितेला पकडून मारहाण केली. इतकंच नाही, तर त्याने पीडितेवर तीन वेळा बलात्कार देखील केला. अत्याचारानंतर आरोपीने धावत्या ट्रेनमधूनच बाहेर फेकून दिलं. अंगावर अर्धवट कपडे असतानाही जखमी अवस्थेत पीडितेने जवळचे पोलीस स्टेशन गाठले. महिलेवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच सतना पोलिसांनी तातडीने रेल्वे पोलिसांसोबत संपर्क साधत आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आरोपीने ट्रेनच्या डब्यात स्वत:ला कोंडून घेतलं होतं. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात मार्चच्या शेवटी उष्णतेतून अवकाळी पावसाकडे – हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’ !

    March 26, 2026

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.