Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भीषण अपघात : लहान मुलासह आठ जण ठार !
    क्राईम

    भीषण अपघात : लहान मुलासह आठ जण ठार !

    editor deskBy editor deskDecember 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना बरेली-नैनिताल महामार्गावर शनिवारी रात्री ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत एका भीषण अपघातात एका लहान मुलासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील भोजीपुरा पोलीस स्टेशन परिसरात टायर फुटल्याने उत्तराखंडहून आलेल्या डंपरची धडक बसल्याने हा अपघात झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्नाला उपस्थित लावून आपल्या घरी परतत होते. दरम्यान, ट्रकने धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त कारने पेट घेतला आणि कार सेंट्रली लॉक असल्याने सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. ट्रकने धडक दिल्यानंतर कारचा टायर फुटला आणि कार महामार्गाच्या विरुद्ध बाजूला पलटी झाली. उत्तराखंडमधून रेती घेऊन आलेल्या या ट्रकने कारला काही अंतर फरपटत नेलं. ही कार मारुती सुझुकी एर्टिगा असल्याचं सांगण्यात येत आहे.मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे, असे बरेलीचे एसएसपी घुले सुशील चंद्रभान यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. मृतांची नावे पुढीलप्रमाणे मोहम्मद इरफान ,मोहम्मद अरिफ, शादाब ,असीम अली , अलीम अली, मोहम्मद अय्युब,मुन्ने अली आणि आसिफ

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026

    जुन्या घरगुती वादातून तरुणावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार !

    April 23, 2026

    चुंचाळेत बेकायदेशीर बियाणे विक्री उघड; एक आरोपी गजाआड

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.