Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन्ही हॉटेलमध्ये आले अन प्रेयसीचा मृतदेह प्रियकराने ठेवला व्हॉट्सअॅप स्टेट्सला !
    क्राईम

    दोन्ही हॉटेलमध्ये आले अन प्रेयसीचा मृतदेह प्रियकराने ठेवला व्हॉट्सअॅप स्टेट्सला !

    editor deskBy editor deskDecember 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरात अनेक गुन्हेगारी घटना शेवटच्या टोकावर जात असल्याच्या घटना घडत असतान एक धक्कादायक घटना चेन्नईच्या क्रोमपेट परिसरातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने तिच्या मृतदेहाचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेसला ठेवल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या एका मैत्रिणीने स्टेटस पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रोमपेटमधील एका हॉटेलमध्ये सकाळी १०.३० वाजता आशिक (२० वर्ष) आणि फौसिया (२० वर्ष) हे दोघे आले होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर फौसिया आणि आशिक यांच्यात जोरदार भांडण सुरु झालं. फौसियाने आशिकच्या मोबाईलमध्ये असेलल्या महिलांच्या फोटोबाबत विचारणा केली. यावरुन आशिकने फौसियाने हॉटेलमध्ये मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्याच टी शर्टने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे फोटो व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवले.

    फौसियाच्या कॉलेजमधील ज्या मैत्रिणींकडे आशिकचा नंबर होता, त्यांना हे स्टेटस पाहून धक्काच बसला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही तत्काळ कारवाई करत परिसरातील सर्व हॉटेल्स, लॉजची झडती घेतली. त्यावेळी क्रोमपेटमधील सीएलसी वर्क्स रोडवरील एका हॉटेलमध्ये फौसियाचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले आणि आशिकला जवळल्या एका हॉटेलमधून अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघे मागील पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी या दोघांचा ब्रेकअप देखील झाला होता. अशिकचे इतर काही महिलांसोबत अफेअर असल्याची माहिती फौसियाला मिळाली होती. त्यानंतर तिने पोलिसांत याबाबत तक्रारदेखील दाखल केली होती.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यपूर्वेतील तणावाचा फटका; गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महाग

    March 7, 2026

    फेसबुक लिंक ठरली महागडी; विवस्त्र व्हिडिओवरून विद्यार्थ्याची लाखोंची फसवणूक

    March 7, 2026

    जिल्ह्यातील कुटुंबावर दुर्दैवाचा आघात; मालेगावजवळ भीषण अपघातात तिघे ठार !

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.