Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री गुपचूप गेला अन प्रियकरासोबत घडल ते थरारक !
    क्राईम

    प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री गुपचूप गेला अन प्रियकरासोबत घडल ते थरारक !

    editor deskBy editor deskNovember 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सांचोर : वृत्तसंस्था

    प्रेमात वेडा झालेले प्रेमीयुगुल कधी काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार राजस्थानच्या सांचोर जिल्ह्यातील चितलवाना पोलीस स्टेशन परिसरातून समोर आला आहे. रविवारी सायंकाळी प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

    जिल्हा पोलीस अधीक्षक सागर राणा यांनी काही लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली. रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली.
    नरेंद्र धोबी हा त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी रात्री गुपचूप तिच्या घरी पोहोचला होता. नरेंद्र गर्लफ्रेंडला भेटत असताना तरुणीच्या कुटुंबीयांनी आणि ओळखीच्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. मुलीच्या घरच्यांनी नरेंद्रला पकडून बेदम मारहाण केली. यामुळे तो गंभीर जखमी झाला.

    सागर राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या कुटुंबीयांना लेखी तक्रार देण्यास सांगितले आहे. तक्रार आल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला जाईल. याबाबत पोलीस अधिकारी पन्ना राम यांनी सांगितले की, नरेंद्र धोबी (27) रविवारी संध्याकाळी रनोदर गावात गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी त्याला मारहाण केली.

    गंभीर अवस्थेत नरेंद्रला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नरेंद्र विवाहित असल्याची माहिती मुलीला नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या दोघांमधील प्रेमसंबंध असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनाही राग आला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.