नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षभरापासून अभिनेत्री कॅटरिना कैफ वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत येत असतात. सध्या ‘टायगर ३’च्या यशाचा आनंद घेत आहे. एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या यशानंतर हा तिसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. आतापर्यंत सिनेमाने ४०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.
कॅटरिना कैफच्या जोया या गाजलेल्या भूमिकेचं याही सिनेमातून कौतुक होतंय. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने कॅटरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये तिने एका भयानक अनुभवाबद्दल सांगितलं आहे. मृत्यूला आपल्या समोर बघणं म्हणजे काय याचा अनुभव अभिनेत्री कॅटरिना कैफला आला. एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘एकदा मी चॉपरवर होते. अचानक हवेमुळे चॉपर अशांत झाले. तेव्हा मला जाणवलं की मृत्यू माझ्यासमोर उभा आहे. मला आठवतं तेव्हा मी फक्त एकच आशा करत होते की माझी आई ठीक असावी. तेव्हा माझा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.’



