Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जोरात हॉर्न वाजविल्याने घरमालकाने केली भाडेकरूची हत्या !
    क्राईम

    जोरात हॉर्न वाजविल्याने घरमालकाने केली भाडेकरूची हत्या !

    editor deskBy editor deskNovember 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    घरासमोर दुचाकीचा जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरूने घरमालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड झाली, त्यानंतर भडकलेल्या भाडेकरुने थेट घरमालकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाडेकरूने मालकाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पुण्याच्या हडपसरमधील उरुळी देवाची परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दादा ज्ञानदेव घुले असे हत्या झालेल्या घरमालकाचे नाव आहे. तर या हत्येप्रकरणी पोलिसांनी संतोष राजेंद्र धोत्रे या संशयितास अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धोत्रे हा घुले यांच्या चाळीत भाडेकरू आहे. सोमवारी दुपारी धोत्रे दारू प्यायल्यानंतर घरात झोपायला गेला. त्यावेळी घुले यांनी घरासमोर दुचाकीचा जोरजोराने हॉर्न वाजवला. त्यामुळे झोपमोड झाल्याने धोत्रेने दादा ज्ञानदेव घुले यांना मारहाण केली. त्यानंतर धोत्रेने पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत बुडवून घुले यांची हत्या केली. घुले रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलीस चौकशीदरम्यान घुले आणि धोत्रे यांच्यात सोमवारी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांना दादा ज्ञानदेव घुले यांचा मृतदेह आढळला. पोलीस तपासात पुढे दादा ज्ञानदेव घुले यांची हत्या झाल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.