Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतात पत्नीला बघितले प्रियकरासोबत : पतीने जिवंत पेटवले !
    क्राईम

    शेतात पत्नीला बघितले प्रियकरासोबत : पतीने जिवंत पेटवले !

    editor deskBy editor deskNovember 20, 2023Updated:November 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला शेतात प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्यानं रागाच्या भरात पतीनं तिला जिवंत पेटवल्याची खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावाजवळच्या शेतात शनिवारी रात्री उशिरा ३५ वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. पतीनं तिला जिवंत जाळल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी नेपाळ सिंहच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पत्नीचे अन्य व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. शनिवारी मध्यरात्री तो झोपेतून जागा झाला. पत्नी घरात कुठेच दिसली नाही. तिचा शोध घेतला. गावाजवळच्या शेतात पत्नीला परपुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितलं. ती व्यक्ती तिथून पळाली. रागाच्या भरात त्याने ‘पराली’ पेटवून दिली. त्यात पत्नीचा मृत्यू झाला, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यातील शाळांमध्ये सुरक्षितता व सुविधा वाढणार; मंत्री भुसेंची घोषणा

    March 18, 2026

    ज्योतिषी प्रकरणात घोटाळा; सुषमा अंधारे महिला आयोगावर बोली!

    March 18, 2026

    विमान अपघाताची खरी माहिती उघड होणार? रोहित पवारांचा सरकारला मोठा इशारा !

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.