Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देशाच्या पायाभरणीत बळीराजाचे स्थान अग्रणी-प्रा.अर्जुन कोकाटे
    राज्य

    देशाच्या पायाभरणीत बळीराजाचे स्थान अग्रणी-प्रा.अर्जुन कोकाटे

    editor deskBy editor deskNovember 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    येवला : प्रतिनिधी 

    इडा पीडा टळू दे बळीच राज्य येऊ दे…जिंदाबाज..जिंदाबाज बळीराजा जिंदाबाज अश्या जयघोषात बळीराजाच्या सन्मानार्थ आज राष्ट्र सेवा दल,अंधश्रद्धा निर्मुलन समिती ,सत्यशोधक समिती, छात्रभारती संघटना व आदी समविचारी गटांनी मिळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत पदयात्रा काढली.

    या देशाला जगविणारा तारणहार राजाच आज संकटात असून आस्मानी आणि सुलतानी संकटाला तो बळी पडतोय,क्रांतिवीर महात्मा फुले,छत्रपती शाहू,छत्रपती शिवाजी राजे यांच्या शेती व शेतकऱ्यांना पुढं नेणाऱ्या विचारांचा आग्रह धरणे काळाची गरज आहे.या देशाच्या पायाभरणीत येथील कृषी संस्कृती व बळीराजाचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे राष्ट्रसेवा दलाचे राज्याध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे यांनी सांगितले.

    बळीराजाची वेशभूषा केलेला सत्यजित चित्ते हा चिमुकला पद यात्रेचे विशेष आकर्षण ठरला. यावेळी प्रा.दिनकर दाणे,रामनाथ पाटील,नवनाथ शिंदे,बाबासाहेब कोकाटे ,कॉम्रेड भगवान चिते,काॅम्रेड किशोर पवार , ॲड.शरद कोकाटे ,चांगदेव मुंढे,सलिल पाटील,प्रा. पी.एन पाटील ,संतोष कोकाटे,नितिन कदम ,रामदास भवर,नवनाथ शिंदे,भाऊसाहेब मगर,शिवाजी साताळकर, सुकदेव आहेर,हेमंत पाटील,भाऊसाहेब जगताप,अमोल सोनवणे,संदिप सोनवणे,दिलीप कोकाटे,नाना मेंगळ,रमेश पवार ,विनोद सोनवणे,उत्तम बंड,आप्पासाहेब शिंदे,खुशाल गायकवाड,सोनवणे सर नाना काळे ,सागर दिघे महेंद्र विघे,जनार्दन धनगे आदी उपस्थित होते.येवला स्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.