Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गेस्ट हाऊसमध्ये महिलेवर सामुहिक अत्याचार !
    क्राईम

    गेस्ट हाऊसमध्ये महिलेवर सामुहिक अत्याचार !

    editor deskBy editor deskNovember 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    आग्याच्या ताजगंज येथील एका गेस्ट हाऊसमध्ये एका महिलेवर जबरदस्तीने दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

    गेस्ट हाऊसमधून महिलेचा आरडाओरडा ऐकून स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस चौकशीत महिलेने आरोप केला की, तिला गेस्ट हाऊसमध्ये दारू पाजल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिने विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त अर्चना सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी मुख्य आरोपी जितेंद्र राठौरसह त्याचे मित्र रवी राठौर, मनीष कुमार आणि देव किशोर यांना अटक केली आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला बळजबरी दारू पाजून आरोपींनी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. पीडिता त्यात आरोपींना रडत विनवणी करताना दिसते. मला लहान लहान मुली आहेत. मला जाऊ द्या, असे ती सांगते. मात्र, आरोपींनी तिच्यावर कोणतीही दयामाया दाखविली नाही

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026

    सराईत गुन्हेगाराची दहशत अखेर उघड; पोलिसांनी काढली धिंड !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.