Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर भीषण अपघात : २३ प्रवासी जखमी तर १२ ठार
    क्राईम

    महामार्गावर भीषण अपघात : २३ प्रवासी जखमी तर १२ ठार

    editor deskBy editor deskOctober 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    देशभरात अनेक अपघात होत असतांना राज्यात देखील समृद्धी महामार्गावर गेल्या काही वर्षापासून अपघातांची मालिका सुरुच असून आज पुन्हा एकदा याच महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण जखमी आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मिनी बसचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे. त्याच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कसा झाला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

    समृद्धीवरील टोल नाक्याजवळ एक ट्रक अचानक समोर आला, अशी माहिती ड्रायव्हरने दिल्याचं पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी सांगितलं. ट्रक कमी वेगात होता की थांबला होता याबाबत पोलीस तपास करत आहेत. समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनीच हा ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते, अशी माहिती काही जणांकडून मिळत आहे. याबाबत सविस्तर चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया यांनी दिली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.