Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ७७ वर्षीय सासूला सुनेची मारहाण ; व्हिडीओमध्ये कैद झाली घटना
    क्राईम

    ७७ वर्षीय सासूला सुनेची मारहाण ; व्हिडीओमध्ये कैद झाली घटना

    editor deskBy editor deskOctober 11, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

     

    प्रत्येक घरातील सासू-सुनेचे नाते खूप महत्वाचे मानले जात असते. पण काही काही परिवारात हेच नाते भयावहक झाले असते. अशाच एका परिवारातील व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. कोपरीमध्ये ७७ वर्षीय ज्योती दयारामानी या सासूलाच ५३ वर्षीय कोमल दयारामानी या सुनेने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी मंगळवारी दिली. या प्रकाराची व्हिडिओ क्लिपही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

     

    Shocking! A video of daughter-in-law brutally beating mother-in-law has come to light. This incident is in Siddharthnagar Kopri in Thane East.#Maharashtra #Mumbai #Thane #viral #viralvideo pic.twitter.com/5kNzcPsWHB

    — Siraj Noorani (@sirajnoorani) October 9, 2023

     

     

    कोपरीतील नाखवा हायस्कूलजवळील सिद्धार्थ नगरातील साई तिर्थ या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. आपल्या तक्रारीमध्ये सासू ज्योती दयारामानी यांनी म्हटले आहे की, १४ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्या घरातील हॉलमधील सोफ्यावर बसलेल्या होत्या. त्यावेळी त्या अशक्त असल्याचे माहिती असूनही त्यांची सून कोमल यांनी त्यांना बेदरकारपणे पकडून हाताने तोंडावर जोराने फटके मारुन खाली खेचून ओढून फरफटत नेले. त्यामुळे त्यांच्या पाठीला, कमरेला दुखापत झाली. त्यानंतर ३ ऑक्टाेबर रोजी ज्योती या घरातील कॉमन वॉशरुम वापरण्यास गेल्या असता, कोमल यांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांच्या हाताला पकडून जोरदार खेचून खाली पाडले. त्यांनी सासूला शिवीगाळ करुन पोटात आणि पाठीवर बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गळा दाबून घरातून जाण्याची धमकीही दिली. या मारहाणीतही त्यांना चांगलाच मार लागला आहे.

    याप्रकरणी कोमल यांनी कोपरी पोलिस ठाण्यात ९ ऑक्टाेंबर रोजी रात्री मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे वागळे विभागाचे सहायक पोलिस आयुक्त गजानन काब्दुले यांनी सांगितले. यातील आरोपी काेमल यांना नोटीस बजावली जाणार असून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली. दरम्यान, यातील सूनेने सासूला मारहाण करीत असल्याचा तसेच घरातून बाहेर जाण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मंगळवारी मोठया प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे या घटनेविषयी ठाणे शहरातून संताप व्यक्त होत आहे.

    #police Crime marhan Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025

    पारोळा तालुक्यात जाळपोळ; मुलीच्या नातेवाईकांचा संताप हिंसक वळणावर

    December 22, 2025

    भरधाव वाहनाच्या धडकेत कपडे विक्रीसाठी जाताना व्यावसायिक ठार !

    December 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.