Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सोनाळा फाट्या जवळ व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून सात लाख लुटणारे ; 5 आरोपी मुद्देमालासह अटक !
    क्राईम

    सोनाळा फाट्या जवळ व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून सात लाख लुटणारे ; 5 आरोपी मुद्देमालासह अटक !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 25, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जामनेर तालुक्यातील सोनाळा येथून पहुर कडे जाणाऱ्या शेतकऱ्याचे शेतमालाची सात लाख रुपये घेऊन जात असताना दोन मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात लोकांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटले होते. या गुन्ह्याप्रकारणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने या गुन्हयाचा माग काढत पाच लुटारूंना मुद्देमालासह अटक केली आहे.

    जामनेर तालुक्यातील सोनाळा तेथील शेतकरी कापूस विक्रीचे सात लाख रुपये घेऊन 24 रोजी सोनाळा वरून पहूरला जात असताना चार अज्ञात मोटरसायकल स्वरांनी अडवून चाकूचा व बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये घेऊन पसार झाले होते याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता या घटनेचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीवरून सोनाळा गावातील गोपाळ हरी पाटील याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर गोपाळ हरी पाटील (सोनाळा ता.जामनेर), त्याने गुन्हा कबूल केला होता व यातील अन्य आरोपींची नावे सांगितली होती आरोपींना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि जालिंदर पळे, उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. संदीप सावळे, जयंत चौधरी, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ. विनोद पाटील, ईश्वर पाटील यांनी प्रवीण रमेश कोळी (वाल्मिक नगर जळगाव), गोपाळ श्रावण तेली (कळमसरा ता. पाचोरा), प्रमोद कैलास चौधरी (कळमसरा ता. पाचोरा), लखन दारासिंग पासी(जुना आसोदा रोड जळगाव) याना अटक करण्यातआली. या आरोपींनी लुटलेले सात लाख रुपये आपसात वाटून घेतले होते व काही प्रमाणात खर्च देखील केले.यांच्याकडून  4 लाख 74 हजार 460 रुपये, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, कट्टा, 5 मोबाईल, 2 मोटार सायकली असा एकूण 5 लाख 96 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.