Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकी अपघातात जळगावातील तरुणाचा मृत्यू !
    क्राईम

    दुचाकी अपघातात जळगावातील तरुणाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskSeptember 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    जळगाव शहरातील मेहरूण येथील २५ वर्षीय तरुणाचा झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जळगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. वावडदा येथील रामदेववाडी जवळ गुरुवारी २८ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास एका दुचाकींचा भीषण अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यातील २५ वर्षीय तरुणाचा क्रवारी दुपारी १ वाजता उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण परिसरातील राम मंदिर येथील रहिवासी निलेश गोकुळ पाटील (वय २५) व महेश रविंद्र खोरपडे (वय ३०) हे दोघे वावडदा येथून गुरुवारी २८ रोजी संध्याकाळी ६. ३० वाजेला जळगावात परतत होते. रामदेववाडीजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यावेळी नागरिकांनी व नातेवाईकांनी निलेशला खाजगी रुग्णालयात तर महेश खोरपडे याला वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी २९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास निलेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर महेश खोरपडे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निलेश पाटील याचे पश्चात वडील, १ भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.

    #accident #jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026

    मुंब्रा विजय भाषणातील वक्तव्यावरून वाद; सहार शेख यांचा खुलासा व माफी

    January 24, 2026

    फॉरेन्सिक अहवालातून धागेदोरे; अभिनेता केआरके गोळीबार प्रकरणात ताब्यात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.