Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन
    जळगाव

    वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 19, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सावखेडा बुद्रूक, ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी यांच्या कुटुंबीयांची जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले.

    जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर 16 नोव्हेंबर, 2021 रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी सावखेडा येथे जावून परदेशी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी परदेशी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. तसेच नियमाप्रमाणे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.

    यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी वीरजवान मंगलसिंग परदेशी यांचे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा-मुलगी यांचे सांत्वन केले. परदेशी कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार किशोर पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंह राजपूत, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.