Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शाळेत अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा संशयित अटकेत 
    क्राईम

    शाळेत अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा संशयित अटकेत 

    editor deskBy editor deskAugust 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी 

     

    सावदा येथील एका शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीची विनयभंग करून पसार झालेला संशयित आरोपी तथा शाळा समितीचा चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान याला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सावदा येथील एका शाळेतील विद्यार्थीनीचा शाळेच्या चेअरमननेच विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शालेय समिती चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान या प्रमुख संशयितासह मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांच्या विरोधात ७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हे फरार झाले होते.

    दरम्यान, अक्रम खान अमानुल्ला खान याला अटक करण्यात येत नसल्याने पालकवर्ग मोठ्या प्रमाणात संतप्त झाला होता. यातून काही दिवसांपूर्वी पालकांनी पोलीस स्थानकावर धडक देऊन संशयितांना अटकेची मागणी केली होती. या अनुषंगाने सावदा पोलिसांनी शालेय समितीचा चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना भुसावळ येथील सत्र न्यायालयात सादर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, दुसरीकडे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांना देखील तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

    #police man arrested Raver Vinaybhanga
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026

    जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडून रोकड लांबविली !

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.