Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संत नगरीत सुरु होते असे कृत्य ; पोलिसांनी टाकला छापा !
    क्राईम

    संत नगरीत सुरु होते असे कृत्य ; पोलिसांनी टाकला छापा !

    editor deskBy editor deskAugust 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेगाव : वृत्तसंस्था

     

    महाराष्ट्राला संत परंपरेची भूमी मानली जाते. त्यातील एक संत नागरी म्हणून शेगावची ओळख देखील आहे. याच नगरीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये कुंटणखाणा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच कुंटणखाण्यावर छापेमारी करत दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकासह दोन महिलांवर शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश देशमुख पप्पू उर्फ आनंद गुजर असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. धार्मिक स्थळ अशी ओळख असलेल्या शेगावमध्ये अशा घटना उघडकीस येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

    शेगाव शहरातील वैभव हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती शेगाल शहर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदर हॉटेलवर छापेमारी केली. या छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली. वेश्याव्यवसाय प्रकरणी एकावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5, 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश देशमुख पप्पू उर्फ आनंद गुजर असे त्याचे नाव आहे. गुजर हा कुंटणखाना चालवत होता. हॉटेलचा मालक आणि मॅनेजरवर पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हॉटेल व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    #police Crime shegaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.