Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाचोऱ्यात पत्रकाला भररस्त्यावर मारहाण ; आमदारांवर पत्रकाराचा संशय !
    क्राईम

    पाचोऱ्यात पत्रकाला भररस्त्यावर मारहाण ; आमदारांवर पत्रकाराचा संशय !

    editor deskBy editor deskAugust 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी 

     

    जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात नुकतीच एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या घटनेवरून जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी आक्रोश मोर्चा निघाला होता. हा मोर्चा भडगाव शहरात देखील निघाला होता यावेळी मुख्यमंत्र्यांनी थेट फोन करीत मुलीच्या पालकांना धीर देत प्रशासनाला आदेश देखील दिले होते. याचे वृत्तांकन स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केले होते. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी आमदार किशोर पाटील यांची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर त्या पत्रकाराला पाचोर्‍यातील भरचौकात मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

     

    काय आहे प्रकरण

    भडगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत नराधमाने खून केल्याची घटना बाहेर येतात पोलिसांनी लागलीच संशयीत आरोपीला जेरबंद केले होते. त्यानंतर भडगाव शहरात जन आक्रोश मोर्चा निघाला होता. या मोर्चात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट फोन करीत परिवाराची विचारपूस करीत प्रशासनाला आदेश दिले होते. याचे वृत्तांकन स्थानिक पत्रकार असलेले संदीप महाजन यांनी केले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणारी बातमी देखील संदीप महाजन यांनी दिली होती. ती बातमी आमदार किशोर पाटील यांना चांगलीच झोंबल्यानंतर त्यांनी थेट पत्रकार संदीप महाजन यांना फोन करीत अश्लील शिवीगाळ केली होती ते एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी थेट आज त्यांच्या समर्थकांकडून या पत्रकाराला भर चौकात मारहाण केले असल्याचे देखील बोलले जात आहे.

    aamdar kishor patil marhan patrkar sandip Mahajan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत

    July 26, 2026

    कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    July 26, 2026

    स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, कार आणि दोन मोबाईल जप्त

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.