Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पहाटेच्या झोपेत असतांना दोन खाजगी बस धडकल्या ; ६ ठार तर २५ जखमी !
    क्राईम

    पहाटेच्या झोपेत असतांना दोन खाजगी बस धडकल्या ; ६ ठार तर २५ जखमी !

    editor deskBy editor deskJuly 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलढाणा : वृत्तसंस्था 

    राज्यातील बुलढाणा जिल्हात गेल्या काही दोन महिन्यापासून बसच्या अपघाताची मालिका नियमित सुरु असून आज पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास दोन खाजगी बसचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक ६ वरती झालेल्या या भीषण अपघातात दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर धडकल्या असून या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    हायवे क्रमांक सहा हा मलकापूर शहरातू जात असतो. या महामार्गावर दोन ट्रॅव्हलचा समोरासमोर धडकल्याची घटना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डाण पुलावरती घडली. या धडकेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर 25 ते 30 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. एम.एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये 35 ते 40 तीर्थयात्री प्रवास करत होत. तर नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. दरम्यान मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक 6 वरती समोरासमोर धडक बसल्याने या बसेसचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही बस चिरडल्याचे पाहायला मिळाले. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन्ही ट्रॅव्हल्स मधील ते 20 ते 25 प्रवासी जखमी आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सीचे पोलीस निरीक्षक यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.