Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अहमदाबादमध्ये चारचाकीने २५ जणांना चिरडले !
    क्राईम

    अहमदाबादमध्ये चारचाकीने २५ जणांना चिरडले !

    editor deskBy editor deskJuly 20, 2023Updated:July 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदाबाद : वृत्तसंस्था 

    गुजरातमधील अहमदाबादमधील इस्कॉन ब्रिजवर बुधवारी रात्री उशिरा जग्वारने सुमारे २५ जणांना चिरडले. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एका होमगार्डचाही समावेश आहे. धडक इतकी जोरदार होती की लोक 30 फुटांपर्यंत दूरवर पडले.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा थार कार ओव्हरब्रिजवर मागून येणाऱ्या डंपरला धडकली होती. हा अपघात पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. यानंतर राजपथ क्लबकडून ताशी 160 किलोमीटर वेगाने येणाऱ्या जग्वारने जमावाला चिरडले. मृतांमध्ये बोताड आणि सुरेंद्रनगर येथील तरुणांचा समावेश आहे. या घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांना सोला सिव्हिलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातात जग्वारचा चालकही जखमी झाला आहे. त्यांना सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    जग्वारमध्ये दोन मुले आणि एक मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. यावेळी उपस्थित संतप्त लोकांनी त्यांना मारहाणही केली. मात्र, काही लोकांनी त्यांना वाचवून रुग्णालयात पाठवले. कारमध्ये बसलेली तरुणी घटनास्थळावरून गायब झाली.

    #gujrat
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सलमान खानचा आर्मी लूक व्हायरल; ‘मातृभूमी’ गाण्याने पेटवली देशभक्तीची भावना

    January 24, 2026

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026

    मुंब्रा विजय भाषणातील वक्तव्यावरून वाद; सहार शेख यांचा खुलासा व माफी

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.