Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ४ ठार तर ८ जखमी !
    क्राईम

    मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ४ ठार तर ८ जखमी !

    editor deskBy editor deskJuly 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ठाणे : वृत्तसंस्था 

    आज सकाळी मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघात झाला आहे. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने काळी पिवळीला जोरदार धडक दिली.

    मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी पडघा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  मुंबई-नाशिक महामार्गावरील खडवली फाट्याजवळ काळी पिवळी जीप प्रवाशांना घेऊन निघाली होती.

    सकाळी ८ वाजेच्या सुमारास काळी पिवळी रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, काळी पिवळी जीप सुमारे ६० फूट दूर फेकली गेली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पडघा पोलिस करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.