Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नव्या लढाईचे रणशिंग शरद पवारांनी फुंकले !
    राजकारण

    नव्या लढाईचे रणशिंग शरद पवारांनी फुंकले !

    editor deskBy editor deskJuly 3, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्याच पुतण्याने जबरदस्त धक्का देत विरोधकांशी हात मिळवणी केल्यानंतर आता या बंडाविरोधात पुन्हा रान उठवण्यासाठी शरद पवार हे बाहेर पडले आहेत. शरद पवार साताऱ्यात पोहोचले असून त्यांनी कराड मधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले. या माध्यमातून पुढील लढाईचे रणशिंग शरद पवार फुंकले. शरद पवार यांच्यासोबत कोल्हापूरचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. या ठिकाणी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

    त्यानुसार शरद पवार सकाळीच कराडच्या दिशेने रवाना झाले. ते कराडमध्ये दाखल झाले असून ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. तसेच शरद पवार यांच्या उपस्थितीत दलित समाजाच्या मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शरद पवार काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

    महाराष्ट्र आणि देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप, या ठिकाणी बोलताना शरद पवार यांनी व्यक्त केला. फोडफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले. या फोडाफोडीचा काही फायदा होणार नाही. लवकरच आपल्याला लोकांमध्ये जाण्याची संधी मिळेल. आपण लोकांपर्यंत जावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. विरोधातील सर्व सरकार अशाच प्रकारे उलथून टाकण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकशाहीचा अधिकार जतन करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला. आजपासून आपली लढाई सुरू झाल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी सरकारमध्ये सामील होत मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात घडलेल्या घडामोडींवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. महाराष्ट्राच्या जनतेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. जे घडले त्याची मला चिंता नाही. उद्या मी बाहेर पडेल, राज्यात आणि देशात जेवढे जाता येईल, जेवढे फिरता येईल, तेवढा मी लोकांचा संपर्क वाढवणार असल्याचे शरद पवार म्हणाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.