Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आजपासून या दरात मिळणार एलपीजी ?
    आरोग्य

    आजपासून या दरात मिळणार एलपीजी ?

    editor deskBy editor deskJuly 1, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    आज जुलै महिन्याचा पहिला दिवस. आज १ जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14.2 किलो एलपीजी सिलेंडर आणि 19 किलो कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, या महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिरच आहेत.

    देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये स्वयंपाकघरातील वापरासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1725 रुपयांवर कायम आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1129 रुपयांवर स्थिर आहे. तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1875.50 रुपये आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, चेन्नईमध्ये एक एलपीजी सिलेंडर 1118.50 रुपयांवर आहे, तर व्यावसायिक सिलेंडर 1937 रुपयांना विकला जात आहे.

    सरकारनं 2023 वर्षाच्या सुरुवातीपासूनच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये बऱ्याचदा बदल केले आहेत. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतींत 83 रुपयांनी कपात करण्यात आली होती. तसेच, मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत घट झाली आणि एका सिलेंडरची किंमत 1856.50 रुपयांवर पोहोचली. एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2028 रुपये होती. मार्चमध्ये त्याची किंमत सर्वाधिक 2119.50 रुपये होती. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769 रुपये होती.

    गेल्या काही महिन्यांपासून एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरमध्ये 50 रुपयांची वाढ झाली होती. तसेच, त्याआधी गेल्या वर्षी 6 जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत मार्चपर्यंत 1053 रुपये होती, त्यात 50 रुपयांनी वाढ झाली होती आणि आता घरगुती सिलेंडर 1103 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.