Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला : मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री मध्यरात्री दिल्लीत !
    राजकारण

    मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला : मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री मध्यरात्री दिल्लीत !

    editor deskBy editor deskJune 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा अचानक दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला असून केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांना स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्ती निमित्त राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट अनेक राज्यमंत्री पद येण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, शिंदे गटातील कोणाला मंत्री करायचे, याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात असल्याचे समजते.

    शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये अस्वस्थ दिसून येत आहे. या संदर्भात अनेक खासदार आणि आमदारांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर मध्ये होते. पंढरपूर येथे सर्व विधी आणि पूजा संपवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी थेट दिल्ली गाठली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रात्री उशिरा भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार या नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली आहे.

    आगामी काळात लोकसभा निवडणूक आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मानला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला स्थान मिळाल्याने शिंदे गटातील नेत्यांमधील असलेली अस्वस्थता कमी होईल. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिंदे गटाला महत्त्वाची ताकद देखील मिळणार आहे. त्यातच भाजपच्या मिशन- 45 ला लाभदायक ठरतील अशाच खासदाराची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीत नवीन ढाबे, हॉटेलला ब्रेक; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांत हटवण्याचे आदेश

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.