Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संजय राऊतांना ‘या’ प्रकरणात मिळाला मोठा दिलासा !
    राजकारण

    संजय राऊतांना ‘या’ प्रकरणात मिळाला मोठा दिलासा !

    editor deskBy editor deskJune 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    ठाकरे गटाचे नेते संजय राऊत अनेक दिवसापासून त्यांच्यावर गोरेगाव येथील पत्रा चाळमधील रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप असून आता अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) उपस्थित संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती.

    दरम्यान संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. ईडीच्या याचिकेवरील सुनावणी आता 11 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हाय कोर्टात धाव घेतली होती. संजय राऊत, प्रविण राऊत यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी ईडीने केली होती. 2010 मध्ये, प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीतील 25 टक्के हिस्सा एचडीआयएलला विकला. त्यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डरांना विकण्यात आले. प्रवीण राऊत यांना एचडीआयएल समूहाकडून 112 कोटी रुपये मिळाले होते, त्यापैकी 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आले होते. पत्रा चाळमधील रहिवाशांची घरे पाडून त्यांना बेघर करण्यात आले. त्यांना वेळेवर सदनिका देण्यात आल्या नाहीत. बिल्डरांनी भाडेकरूंना भाडे देणेही बंद केले, अस आरोप ईडीने केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.