Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एकाच महिन्यात रेल्वेचा दुसरा अपघात ; १२ डब्बे घसरले !
    क्राईम

    एकाच महिन्यात रेल्वेचा दुसरा अपघात ; १२ डब्बे घसरले !

    editor deskBy editor deskJune 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    ओडिशातील बालासोर तीन गाड्यांची धडक झाल्यानंतर तब्बल 22 दिवसांतील हा दुसरा रेल्वे अपघात पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात रविवारी सकाळी दोन मालगाड्यांमध्ये झालेल्या धडकेत १२ डबे रुळावरून घसरले. मात्र यामध्ये जीवित व वित्तहानी फारशी झाली नाही. या धडकेच्या जोरदार आवाजाने ओंडा रेल्वे स्थानकाच्या आसपासचे लोक जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीच मालगाडीच्या लोको पायलटला सुखरूप बाहेर काढले.

    रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, लोको पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर तुटल्याने आद्रा-खड़गपूर सेक्शनमधील रेल्वे वाहतूक सुमारे दोन तास प्रभावित झाली होती. घटनास्थळी पोहोचलेले दक्षिण पूर्व रेल्वेचे विभागीय सुरक्षा अधिकारी दिवाकर माझी यांनी पत्रकारांना सांगितले- ओंडा रेल्वे स्थानकावर एक मालगाडी आधीच उभी होती. मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने धडक दिली. अखेर हा अपघात कसा झाला, हे तपासानंतरच कळेल. सिग्नल बिघाड झाला असावा.

    अन्य एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, बांकुराहून विष्णुपूरला जाणारी एक मालगाडी ओंडा स्टेशनच्या लूप लाइनवर उभी होती. याच मार्गावर मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, मागील मालगाडीचे इंजिन समोरील मालगाडीवर चढले. दक्षिण पूर्व रेल्वेचे सीपीआरओ आदित्य कुमार चौधरी यांनी सांगितले की, एक मालगाडी लूप लाइनमध्ये उभी होती आणि दुसरी ट्रेन सिग्नलवर थांबणार होती, पण ती रेड सिग्नलच्या पुढे गेली, ज्यामुळे हा अपघात झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. अपघातानंतर सकाळी 8.30 च्या सुमारास पहिली गाडी या मार्गावर धावली. आतापर्यंत 11 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.