Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुण्यात अग्नितांडव ; इमारतीत अडकले ३० लोक !
    क्राईम

    पुण्यात अग्नितांडव ; इमारतीत अडकले ३० लोक !

    editor deskBy editor deskMay 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    पुणे येथील कल्याणीनगर परिसरातील मारीगोल्ड आयटी पार्क येथे एका इमारतीला अचानक भीषण आग लागल्याने इमारतीमधील अनेकांची तारांबळ उडाली आहे. या आगिचे धुराचे लोट हवेत दुरवर पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील कल्याणीनगर परिसरातील मारीगोल्ड आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल झाली आहेत. आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी गच्चीवर धाव घेतली. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुटका झाली आहे. तर अजून काही नागरिक इमारतीत अडकल्याची शक्यता आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरेसवर जवळपास ३० लोक अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बळीराजासाठी दिलासादायक बातमी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा

    June 23, 2026

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.