Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बारावीची परीक्षा महागली ; शिक्षण मंडळाचा निर्णय !
    राजकारण

    बारावीची परीक्षा महागली ; शिक्षण मंडळाचा निर्णय !

    editor deskBy editor deskMay 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिकचे म्हणजेच बारावीच्या परीक्षेचे शुल्क वाढविले आहे. जुलै २०२३च्या पुरवणी परीक्षेपासून शुल्कात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे.

    विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी, द्विलक्षी शाखेतील नियमित व खाजगी विद्यार्यांसाठी ४४० रूपये परीक्षा शुल्क राहणार. त्याखेरीज प्रशासकीय शुल्क २०, गुणपत्रिका शुल्क २०, प्रात्यक्षिक परीक्षा प्रती विषय १५ रूपये तर एमसीव्हीसीसाठी ३० तसेच माहिती तंत्रज्ञान शाखेच्या प्रत्येक विषयासाठी २०० रूपये शुल्क आकारल्या जाणार आहे.

    पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी हेच शुल्क लागू होणार. श्रेणी सुधारण्यासाठी अ श्रेणी सुधार योजनेत सहभागी नियमित तसेच पुनर्परिक्षार्थी यांना ८८० रूपये पडतील. ब श्रेणीतील खाजगी विद्यार्थ्यांना ८८० रूपये लागू होणार. तसेच प्रशासकीय व गुणपत्रिका शुल्क प्रत्येकी २० रूपये. प्रात्यक्षिक परीक्षा १५ रूपये व माहिती तंत्रज्ञान २०० रूपये पडणार आहे. इतर तुरळक विषयांसाठी अ श्रेणीस १२० तर ब श्रेणीस ४८० रूपये पडणार. प्रशासकीय व गुणपत्रिका शुल्क २० रूपये व प्रात्यक्षिक परीक्षा प्रती विषय १५ रूपये पडणार.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.