Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाटील नावावरून वाद ; गौतमी अडकणार वादात ?
    राजकारण

    पाटील नावावरून वाद ; गौतमी अडकणार वादात ?

    editor deskBy editor deskMay 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    दुकानाचं उद्घाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. यामुळे सध्या गौतमी आणि कार्यक्रमात राडा हे जणू समीकरणच बनत चाललं आहे. यामुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. यातच आता गौतमीच्या आडनावावरून वाद निर्माण झाला आहे.

    गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपून ठेवल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. यावर काल विरारमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या गौतमीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तिने आडनावावरून वाद झालेल्या विषयावर भाष्य केले. ती म्हणाली की, “मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना. मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. मला कोणी काहीही बोलले तरी मला काही फरक पडत नाही,” असे स्पष्ट गौतमीने सांगितले.
    “मी कसलीही बदनामी करत नाही.

    माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे. तो मी पार पाडत असते. चांगला कार्यक्रम होत असतो. कोण मला नावे ठेवतो मला फरक पडत नाही. कुणाला माझ्या कार्यक्रमावर आक्षेप असेल, प्रश्न असेल तर त्यांनी माझा कार्यक्रम पूर्ण पाहावा त्यानंतर बोलावे”, असं थेट आव्हानच गौतमीने दिले आहे. यावेळी गौतमीला राजकारणात येणार का? असा सवालही करण्यात आला. यावर तिने राजकारणात येणार नसल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला. ‘गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपवले असल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. “गौतमीचे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव वापरून तिने पाटलांची बदनामी केली. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये, अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही,” असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.