Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निवडणुकीत फक्त दोन मते मिळवून पती-पत्नी विजयी; कुठे वाचा सविस्तर..!
    अमळनेर

    निवडणुकीत फक्त दोन मते मिळवून पती-पत्नी विजयी; कुठे वाचा सविस्तर..!

    editor deskBy editor deskMay 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    निवडणुकीत एखाद्याला केवळ दोन मते मिळाली आणि त्यातही ते विजयी झाले असे कोणी तुम्हाला सांगितल्यास तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण असे घडले आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत. त्यात पती-पत्नीला केवळ दोन मते मिळाली आणि त्यातही ते विजयी झाले असा कोणालाही विश्वास न बसणारी घटना समोर आली आहे. कुठे वाचा सविस्तर.

    लोण गावातील शहीद जवान लीलाधर शिंदे हे शहीद झाले. त्यांचा दुखवटा म्हणून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत च्या पोटनिवडणुकीत मतदान न करण्याच्या निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे गावकऱ्यांनी मतदान केले नाही मात्र पोलिस पाटील आणि इतर दोन जण मतदानाला आल्याने या प्रभागात फक्त तीन मतदान झाले. त्यात हिलाल भटा पाटील व लीलाबाई हिलाल पाटील हे पती-पत्नी यांना प्रत्येकी फक्त दोन दोन मते मिळाल्याने ते विजयी झाले आहेत. तर एक मत नोटाला पडले. एका प्रभागात शून्य मतदान झाल्याने त्या प्रभागातील जागा पुन्हा रिक्त राहिली आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी विठ्ठल पाटील, तलाठी पी. एस. सोनवणे, तलाठी वाल्मीक पाटील व नितीन ढोकने यांनी मतदान व मतमोजणीसाठी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    भरधाव कारची दुचाकीला धडक; अमळनेरात एक जखमी

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.