Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजपची चिंता वाढणार : शिंदे गटाची लागणार मंत्रीमंडळात लॉटरी !
    राजकारण

    भाजपची चिंता वाढणार : शिंदे गटाची लागणार मंत्रीमंडळात लॉटरी !

    editor deskBy editor deskMay 14, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    कर्नाटक निवडणुकीत भाजपचा कॉंग्रेस पक्षाने मोठा पराभव केला आहे. त्यावर आता माेदी सरकार आणि भाजपमध्ये माेठे फेरबदल हाेण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या निकालामुळे माेदी सरकारला २०२४ मध्ये हाेणाऱ्या लाेकसभा निवडणुकीची चिंता लागली आहे. ती ध्यानात ठेवून पंतप्रधान माेदी लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात. तसेच पक्ष पातळीवरही संघटनात्मक फेरबदल हाेण्याची शक्यता आहे.

    माेदी सरकारला ९ वर्षे पूर्ण हाेणार आहेत. मात्र, कर्नाटकमधील पराभवामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. हा जल्लाेष साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच कर्नाटकच्या पराभवामुळे पक्षात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. नरेंद्र माेदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात चर्चा झाली असून, लवकरच माेदी सरकारमध्ये बदल दिसणार आहेत. पीएमओने सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल दिसू शकताे. यात महाराष्ट्रातून शिंदे गटातील एका नेत्याचा मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

    महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, पंजाब या राज्यांमध्ये लाेकसभेच्या १९२ जागा आहेत. तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळच्या १०१ जागांवर भाजप कुठेच नाही. आता लाेकसभेच्या २८ जागा असलेले कर्नाटकही हातचे गेले. या जागा विचारात घेऊन मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे.

    राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला, त्याचवेळी त्यांची संपूर्ण टीम २०२४ पर्यंत कायम राहणार असे ठरले हाेते. लाेकसभा निवडणुकीनंतरच नवे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड हाेईल. नड्डा यांचे गृहराज्य हिमाचलमध्ये तसेच संघटन सरचिटणीस बी. एल. संताेष यांचे गृहराज्य कर्नाटकमध्येही सत्ता गेली. त्यामुळे लाेकसभा निवडणुकीसाठी पक्षाला सक्षम चेहरे आवश्यक वाटू लागले आहेत. भूपेंद्र यादव व धर्मेंद्र प्रधान यांच्यासह काही मंत्र्यांना पक्षकार्य दिले जाऊ शकते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.