Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हॉलिडे एन्जोय करण्यासाठी गेलेल्या मुलीसोबत घडले असे काही !
    क्राईम

    हॉलिडे एन्जोय करण्यासाठी गेलेल्या मुलीसोबत घडले असे काही !

    editor deskBy editor deskMay 11, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सुट्टीच्या काळात अनेकांना फिरायला जायला आवडते. लोक इन्जॉय करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जातात. पर्यटनस्थळी हॉटेल अथवा एखाद्या भक्तनिवासात मुक्काम करतात. पण आता एखादा बंगला किंवा रूमही भाड्याने घेण्याचा ट्रेंड आहे.

    हॉटेलच्या तुलनेने हे स्वस्त आणि मस्त असल्याने अनेक पर्यटक याचा वापर करतात. परंतु हे किती घातक ठरू शकते याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियात १४ मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या २६ वर्षीय Kennedy CalWell सोबत जे घडले त्याने तिच्यासह तिचे फ्रेंडही घाबरले आहेत. एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त आलेल्या लेडीज ग्रुपमधील मुलीला घरात काहीतरी अजब घडत असल्याचा संशय आला. अशावेळी मुलींनी फ्लॅश लाईट ऑन करून घरातील कानाकोपरा शोधण्यास सुरूवात केली.
    शॉवरहेड, पिक्चर फ्रेमपासून दरवाजाच्या लॉकपर्यंत सगळीकडे मुलींनी शोध घेतला. तेव्हा बाथरूममध्ये जे काही पाहिले त्याने मुलींच्या पायाखालची जमीन सरकली. या प्रॉपर्टीच्या बाथरूममध्ये प्लग सॉकेटखाली एक छोटासा कॅमेरा होता. या कॅमेऱ्यातून अंघोळ करणाऱ्या मुलींचे नग्न व्हिडिओ कुणीतरी बनवत असल्याचे पाहून मुलींना मोठा धक्का बसला. खोलीत छुपे कॅमेरे कसे असतात याबाबत व्हिडिओत मुलींनी पाहिले होते. त्यामुळे ज्या घरात थांबलोय त्याची पाहणी करायला हवी असं मुलींनी ठरवले. बाथरुममध्ये मुलींना जो छुपा कॅमेरा मिळाला तो टॉयलेट सीट आणि शॉवर घेतानाचे दृश्य कैद करणारे होते. हा कॅमेरा पाहून मज्जा करण्यासाठी आलेल्या मुलींना शॉक बसला. त्यानंतर तातडीने पोलिसांना फोन करून मुलींनी हा प्रकार सांगितला.

    पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी तपासणी करत घरमालकाला चौकशीला बोलावले. परंतु हा कॅमेरा मी लावला नाही असं घरमालकाने म्हटलं. याआधी इथं राहण्यासाठी आलेल्या गेस्टने हा कॅमेरा लावला असावा असा दावा मालकाने केला. मुलींच्या सतर्कतेमुळे त्यांचे व्हिडिओ बनवता आले नाहीत. मात्र अनोळखी ठिकाणी खोली घेताना रूममध्ये सर्वकाही तपासणी करणे गरजेचे आहे अन्यथा ते धोकादायक ठरू शकते असं मुलींनी म्हटलं. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून दोषींवर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बळीराजासाठी दिलासादायक बातमी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा

    June 23, 2026

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.