Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गौतमीचा तो व्हिडीओ केल्याप्रकरणी अल्पवयीन अटकेत !
    क्राईम

    गौतमीचा तो व्हिडीओ केल्याप्रकरणी अल्पवयीन अटकेत !

    editor deskBy editor deskMay 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील ‘सबसे कातील गौतमी पाटील’ अशीच चर्चा सध्या प्रत्येक गावागावात असलेल्या गौतमीचा काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कपडे बदलतानाचा तिचा व्हिडिओ काढण्याचा खोडसाळपणा केला गेला होता. तो व्हिडिओ काढणारा कोण याचा तपास पोलिस घेत होते. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं असून तो मुलगा अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

    ‘सबसे कातील गौतमी पाटील’ अशीच चर्चा सध्या गावागावात सुरु असते. अश्लील डान्स केल्याप्रकरणी गौतमीवर प्रचंड टीका झाली होती. यानंतर तिने माफी मागितली तरी तिचा डान्स हे काय लावणी नाही असंच मत अनेकांनी व्यक्त केलं. दरम्यान गौतमीची क्रेझ वाढतच चालली होती तोच तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला. एखाद्या महिलेसोबत हे कृत्य करणं चूकच आहे मग ती कोणतीही महिला असो. व्हिडिओ कोणी काढला याचा शोध सायबर पोलिसांनी सुरु केला. अखेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं. तो अल्पवयीन असल्याने त्याच्या आई वडिलांना विमाननगर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे. गौतमीचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगानेही याची दखल घेतली होती. त्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही करण्यात आली होती. आता आरोपी अल्पवयीन असल्याने या प्रकरणी योग्य त्या नियमांप्रमाणे कारवाई होईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बळीराजासाठी दिलासादायक बातमी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा

    June 23, 2026

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.