Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव वेगात शिवशाही बस पलटली ; २२ जण जखमी !
    क्राईम

    भरधाव वेगात शिवशाही बस पलटली ; २२ जण जखमी !

    editor deskBy editor deskApril 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचं सत्र सुरूच आहे. भरधाव वेगाने जाणारी शिवशाही बस पलटल्यामुळे तब्बल २२ जण जखमी झाले आहेत, तर अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. कर्नाळा खिंडीतील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली आहे.

    या बसमधून ३८ प्रवासी आणि चालक व वाहक असे एकूण ४० जण प्रवास करत होते. दिप्तेश मोरेश्वर टेमघर (३१, रा. अष्टमी, ता. रोहा) असं अपघातात मृत प्रवाशाचं नाव आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पनवेलवरुन महाडकडे निघालेल्या भरधाव वेगाने शिवशाही बसचा कर्नाळा खिंडीत आल्यानंतर अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पेण येथील कल्पेश ठाकूर यांनी अपघातग्रस्तांची मदत केली. जखमींना आपल्या दोन रुग्णवाहिकांमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यास त्यांनी मोठी मदत केली. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.