Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीच्या सासरी जात नकार दिल्याने तरुणाने घेतला निर्णय !
    क्राईम

    प्रेयसीच्या सासरी जात नकार दिल्याने तरुणाने घेतला निर्णय !

    editor deskBy editor deskApril 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    प्रेम आंधळं असतं आणि प्रेमात माणूस काहीही करू शकतो असं आपण बऱ्याच वेळा ऐकत आलो आहे. प्रेमात कधी धोका मिळाला तर माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचा काहीच नेम नाही. दरम्यान असेच एक प्रकरण उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून `समोर आले आहे.

    प्रेयसीने लग्न केल्याने प्रियकर थेट मुलीच्या घरी प्रेयसीला भेटायला गेला. यावेळी प्रेयसीने सोबत येण्यास नकार दिल्याने तिच्याच घरात थेट गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. डेहराडूनच्या प्रेमनगर भागातील ही घटना आहे. प्रियकर आणि प्रेयसीचे घर जवळच होते. परंतु मागच्या दोन महिन्यांपासून प्रेयसी आपल्या सोबत बोलत नसल्याने नाराज प्रियकर तिच्या घरी कोण नसल्याचा फायदा घेत तिला भेटायला गेला. यावेळी त्यांच्या एक तास चर्चा झाली. लग्न झालेली प्रेयसी पुन्हा त्याच्यासोबत यावी असा प्रियकराचा आग्रह होता. प्रेयसीने ते मान्य न केल्याने प्रियकराने थेट तिच्या घरीच आत्महत्या केली.

    सोमवारी सकाळी ही महिला घरात एकटीच होती. संधी साधून शाहनवाज तिच्या घरात घुसला, तिथे दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. शाहनवाजने तिच्यावर पुन्हा प्रेमसंबंध सुरू करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली, परंतु महिलेने ते मान्य केले नाही. त्यानंतर शाहनवाजने महिलेला धमकी दिली की मी तिला तिच्यासमोर आत्महत्या करेन परंतु त्या महिलेने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. काही वेळाने शाहनवाज हा महिलेच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. तेथे त्याने केबलची वायर घेत पंख्याला बांधून आत्महत्या केली. या घटनेत प्रेयसीने त्याला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु महिलेला काहीच यश आले नाही. मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाहनवाज हा रोजंदारी करत होता. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.