Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जनता पुन्हा चुलीकडे ; गॅस सिंलिडरवर वर्षभरात झाली इतकी दरवाढ !
    राजकारण

    जनता पुन्हा चुलीकडे ; गॅस सिंलिडरवर वर्षभरात झाली इतकी दरवाढ !

    editor deskBy editor deskApril 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    सर्वसामान्यांवर महागाईचे संकट आले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचे दर सतत वाढत आहेत. गॅस सिंलिडर तर अकराशे रूपयांवर गेल्याने गरिबांना पून्हा चुलीकडे वळावे असे वाटू लागले आहे. विशेषत: कोरोनानंतर सिलिंडरच्या दरात वाढच होत आहे. केंद्र शासनाकडून मिळणारी सबसिडीही बंद झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना सिलिंडरचा खर्च झेपवत नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांत सातत्याने होत असलेल्या पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जेरीस आले आहेत. कोरोना संकटानंतर अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे दरवाढीपासून दिलासा मिळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र अत्यावश्यक असलेले इंधन आणि सिलिंडर दिवसेंदिवस महागच होत चालले आहे.

    गेल्या काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलचे दर काही प्रमाणात स्थिर आहेत. मात्र, सिलिंडर दरवाढीचा मटका सुरू आहे. मार्च २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान घरगुती वापराचा सिलिंडर सुमारे २२.५ टक्क्यांनी (२०३ रूपयांनी) महागला आहे. एक मार्च २०२२ ला घरगुती वापराचा १४ किलोचा सिलिंडर ९०२ रुपयांना मिळत होता. एक एप्रिल २०२३ला तो १ हजार १०५ रुपयांना झाला. भविष्यात ही किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान मात्र हे दर स्थिर होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    महिला आरक्षणावरून विरोधकांचा विश्वासघात; मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.