Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सोन्याच्या भावाने घेतली भरारी ; जाणून घ्या काय आहे दर !
    राजकारण

    सोन्याच्या भावाने घेतली भरारी ; जाणून घ्या काय आहे दर !

    editor deskBy editor deskApril 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    देशात होत असलेल्या महागाईवर आता कुणीही त्यावर तोडगा काढण्यास तयार नाही पण राज्यात होणारे लग्नसराई मात्र त्याच महागाईमध्ये मोठ्या धमाक्यात साजरा होत आहे. त्या महागाईत भर म्हणून सोन्याच्या भावाने ग्राहकांना झटकाच दिला आहे.
    दिपावली पर्यंत सोनं ६५ हजारापर्यंतो पोहचू शकत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा दरात वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत सोने ६५,००० रुपये आणि चांदी ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या चांदी ७६, ००० रुपयांवर पोहोचली आहे. सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. बुधवारी सायंकाळी सोन्याचा भाव ६०६१३ रुपये आणि चांदीचा भाव ७४९४० रुपये किलो झाला.

    बुधवारी संध्याकाळी इंडिया बुलियन्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमतीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०६१३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव ७४९४० रुपये प्रति किलो झाला आहे. याशिवाय २३ कॅरेट सोन्याचा भाव ६०३७० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५५२२ रुपये, २० कॅरेट सोन्याचा भाव ४५४६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

    आज दिल्लीत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,३५० रुपयांवर आहे. मुंबईत आज १० ग्रॅम सोन्याचा दर५६,१०० रुपयांवर आला आहे. आज कोलकातामध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर५६,१०० रुपयांवर आला आहे. चेन्नईमध्ये आज १० ग्रॅम सोन्याचा दर ५६,७६० रुपयांवर आला आहे. भारतातील सोन्या-चांदीच्या किमती डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. जागतिक मागणी देखील मौल्यवान धातूंच्या दरामध्ये दिसून येणारा ट्रेंड ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    महिला आरक्षणावरून विरोधकांचा विश्वासघात; मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.