Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ११ बायका गेल्या सोडून १२ वी ने केला विरोधात दारुड्याने केले असे काही !
    क्राईम

    ११ बायका गेल्या सोडून १२ वी ने केला विरोधात दारुड्याने केले असे काही !

    editor deskBy editor deskApril 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    झारखंडमधील बोकारो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीने दारु पिण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत झालेली त्याची १२वी पत्नी होती. याआधी त्याने ११ लग्ने केली होती पण दारू पिऊन भांडण झाल्यामुळे अगोदरच्या पत्नींनी घटस्फोट घेतला. यानंतर त्याने बारावे लग्न केले. दरम्यान या पत्नीने देखील दारू पिण्यास पतीला विरोध केला. यावेळी त्याला राग आला, त्याने रागाच्याभरात पत्नीची हत्या केली. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली आहे.

    मिळालेली माहिती अशी, झारखंडमधील बोकारो येथे राहणाऱ्या रामचंद्र तुरी याने १२ लग्ने केली होती. दारू पिऊन भांडण झाल्यामुळे अगोदर ११ पत्नींनी घटस्फोट घेतला. रामचंद्र याचा १२वा विवाह सावित्री देवी यांच्याशी २० वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना चार मुले आहेत. हैदराबादमध्ये एक मुलगा मजूर म्हणून काम करतो. तर तिघेजण बाहेर गेले होते. सोमवारी घरात रामचंद्र आणि त्याच्या पत्नीशिवाय कोणीही घरी नव्हते. रामचंद्र दारु पिऊ लागला तेव्हा पत्नीने विरोध केला. याचा राग येऊन रामचंद्राने पत्नी सावित्री देवीची हत्या केली.
    यापूर्वीही आरोपीच्या ११ विवाह केले होते. दारू पिऊन भांडण झाल्यामुळे सगळ्या पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. रामचंद्राच्या १२व्या पत्नीनेही त्याला दारू पिण्यास विरोध केल्यावर त्याने तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामचंद्र याला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. पोलिसांनी रामचंद्रच्या बारा लग्नांना दुजोरा दिलेला नाही. पोलिसांव्यतिरिक्त, गावातील पंचायत सदस्याने सांगितले की ही त्याची १२वी पत्नी होती.

    रामचंद्रने पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली, जेव्हा त्याची पत्नी सावित्रीने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने रागाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण होत असताना सावित्री अशुद्ध पडली, मात्र आरोपीने लाठ्या-काठ्याने मारहाण सुरुच ठेवली. आरोपीने पत्नीला मरेपर्यंत मारहाण केली. रात्री मुलं घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी तपास केल्यानंतर आरोपीला अटक केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.