Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वेमध्ये पेट्रोल ओतून प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या नराधमाच्या आवळल्या मुसक्या !
    क्राईम

    रेल्वेमध्ये पेट्रोल ओतून प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या नराधमाच्या आवळल्या मुसक्या !

    editor deskBy editor deskApril 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    केरळमधील एका ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, आग लावून ३ प्रवाशांना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. त्याला रत्नागिरी येथून अटक करण्यात आली आहे. शाहरुख सैनी असे या आरोपीचे नाव आहे. सेंट्रल इंटेलिजन्स आणि महाराष्ट्र एटीएस यांच्या संयुक्त पथकाने रात्री उशिरा रत्नागिरी रेल्वेस्टेशन जवळून त्याला अटक केली.

    अलप्पुझा आणि कन्नुर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये २ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.४५ च्या दरम्यान, कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर ट्रेन पोहोचली असताना प्रवाशांसोबत झालेल्या वादातून आरोपी शाहरुख सैफी याने सहप्रवाशांवर एक ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिले. त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तीन प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. यामध्ये एक वर्षाच्या मुलासह एक महिला आणि एक अन्य व्यक्ती अशा तीन जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रेल्वे रुळावर सापडले होते. तर इतर ८ प्रवासी जखमी झाले होते. घटनेनंतर आरोपी शाहरुख सैफी अंधाराचा फायदा घेत गाडीतून उडी मारून फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.

    दरम्यान, आरोपी शाहरुख सैफी याचं लोकेशन रत्नागिरीत असल्याचं तपास यंत्रणांना समजलं होतं. ट्रेनमधून खाली उडी मारताना त्याला जखम झाली होती. या जखमेवर उपचार करण्यासाठी तो रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र तो पूर्ण उपचार घेण्याआधीच रुग्णालयातून पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी रत्नागिरीत शोधमोहीम हाती घेऊन आरोपी शाहरुखच्या मुसक्या आवळल्या. सध्या तो रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.